रेल्वेस्थानक रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By Admin | Updated: July 26, 2014 00:52 IST2014-07-26T00:22:14+5:302014-07-26T00:52:47+5:30

रेल्वेस्थानक रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Survey by the road officials of the railway station | रेल्वेस्थानक रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

रेल्वेस्थानक रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे व बसस्थानकाबाहेर पडणाऱ्या रस्त्याची नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
नाशिकरोड बस स्थानकाबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरूंद झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुनील वाघ, कन्हैया साळवे, विभागीय अधिकारी किशोर
चव्हाण, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी यांनी आज दुपारी पाहणी केली. यावेळी परिसरातील दुकानदार, रिक्षा, टॅक्सीचालक यांनी रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Survey by the road officials of the railway station