लष्करी अळीच्या प्रादूर्भावाचे बागलाण तालुक्यात सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:38 PM2020-06-26T16:38:51+5:302020-06-26T16:39:29+5:30

सटाणा : येथील तालुका कृषी अधिकारी तसेच वडेल कृषी विज्ञान केंद्राने बागलाण तालुक्यातील मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले असून २ ते ३ टक्केच अळीचा प्रादूर्भाव असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

Survey of outbreak of military larvae in Baglan taluka | लष्करी अळीच्या प्रादूर्भावाचे बागलाण तालुक्यात सर्वेक्षण

लष्करी अळीच्या प्रादूर्भावाचे बागलाण तालुक्यात सर्वेक्षण

Next

गुरु वारी (दि.२६) लखमापुर , यशवंतनगर , मुंजवाड , कंधाणे , निकवेल , डांगसौंदाणे , वटार व तरसाळी येथे सर्वेक्षण करण्यात आले. बागलाण तालुक्यात ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झालेली आहे . सध्या मका पीक १५ ते २० दिवसाचे झाले असून वाढीच्या अवस्थेत आहे.गेल्या ५ ते ६ दिवसापासुन मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे . लष्करी अळी सद्या प्रथम व द्वितीय अवस्थेकडे गेल्याचे दिसुन आलेले आहे . याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार ,वडेल कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ विशाल चौधरी, मंडळ कृषी अधिकारी आर. एन. चव्हाण , व्ही . डी. ह्याळिज ,कृषी पर्यवेक्षक सी. बी.देवरे, कृषी सहाय्यक आर. एफ. जाधव , एन. एस. जाधव , बी. एच. थोरात , आर. जी. कांबळे , डी. एस. सोनवणे , एस. एस. नहिरे आदी उपस्थीत होते.
अशा करा उपाय योजना....
पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एकरी १० पक्षी थांबे व ५ कामगंध सापळे लावावेत, पिकात पेरणीपासून पहिल्या १० ते १५दिवसात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा १०००० पीपीएम निम आॅईल २ मिली / पंप किंवा १५०० पीपीएम असल्यास ५ मिली / पंप प्रतिबंधात्मक फवारणी करावी, अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास रासायनिक किटकनाशकांची- इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ८ ग्रॅम / पंप किंवा स्पिनोटोरम ११.७ टक्के ईसी ७ मिली / पंप फवारणी करावी, त्यानंतर २५ ते ३० दिवसांनी थायोमिथॉक्झोन १२.६ टक्के + लॅमडा सहलोस्थीन ९.५ टक्के झेड्सी ८ मिलि / पंप फवारणी करावी. त्यानंतर प्रादूर्भाव दिसून आल्यास क्लोरअन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के पंप फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
 

Web Title: Survey of outbreak of military larvae in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.