सर्वेक्षणाचे काम चुकीचे
By Admin | Updated: July 16, 2016 00:28 IST2016-07-16T00:15:28+5:302016-07-16T00:28:08+5:30
शिंदे ग्रामस्थांचा आरोप

सर्वेक्षणाचे काम चुकीचे
नाशिकरोड : नाशिक-पुणे चौपदरीकरणाच्या कामात शिंदेगाव येथील सर्वे$क्षण व भूसंपादनाची मोजणी चुकीच्या पद्धतीने झालेल्या ग्रामस्थांच्या आरोप व आक्षेपामध्ये तथ्य दिसल्याने गुरुवारी पुन्हा सर्वेक्षण व भूसंपादनाची मोजणी करण्यात आली.
नाशिक-पुणे महामार्ग चौपदरी करणाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे सर्वेक्षण व भूमिअभिलेख विभागाकडून भूसंपादनाची मोजणी करण्यात आली होती. शिंदे गाव स्मशानभूमीजवळील छोटा पूल ते शिंदेगाव व्यायामशाळेपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांकरिता २००९ मध्ये झालेल्या रस्त्याचे सर्वेक्षण व भूसंपादन मोजणी नकाशामध्ये घरे, दुकाने काहीच नसल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे काही घरे, दुकाने, चाळी नकाशानुसार बाधित आहेत ते अतिक्रमित असल्याचे सांगण्यात येत होते.
सर्वेक्षण व चुकीच्या पद्धतीने झालेले सर्वेक्षण व भूसंपादन मोजणीमुळे जागेचा मोबदलादेखील मिळणार नव्हता. मात्र ग्रामस्थांच्या आक्षेपामध्ये तथ्य असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले. यामुळे पुन्हा नव्याने महामार्गाचे सर्वेक्षण व भूसंपादनाची मोजणी झाली.