शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम, जुळ्या भावंडांना मार्कही मिळाले जुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:28 IST

नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदहावी परीक्षा। अनोख्या घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.जुळ्यांच्या चेहऱ्यांबरोबरच स्वभावही सारखे असतात. त्यातून अनेक रंजक घटनादेखील घडतात. नाशिकमध्ये मात्र अत्यंत दुर्मीळ घटना घडली आहे. शहरातील बॉइज टाउन शाळेत जाणारे ओम आणि शिवानी बिरारी हे जुळे भावंडे. त्यांना दहावीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळाले असल्याने साऱ्यांनाच या घटनेमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. दहावीच्या परीक्षेत या दोघांना प्रत्येक विषयात मिळालेले गुण कमी-अधिक असले तरी दोघांच्या गुणांची बेरीज मात्र ५०० पैकी ४४१ इतकीच येत असल्यामुळे दोघांना एकूण ८२.२० टक्के गुणच मिळाले आहेत.जुळ्या मुला-मुलींच्या बाबतीत अशाप्रकारे मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ओम आणि शिवानी यांचा जन्म १ मे २००४ रोजीचा. दोघेही अभ्यासात हुशार. अर्थात, ते जुळे भावंडं असले तरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. खाणे-पिणे, मनोरंजनाचा अभ्यास हे सर्वच वेगळे आहे. अभ्यासातही ओमला गणित, तर शिवानीला जीवशास्रासारखा विषय आवडतो. परंतु दोघांचे गुण मात्र ८५ ते ९० टक्केच असतात. हे मात्र नक्की. यंदा मात्र दहावीच्या विषयाला दोघांनी वेगळाच विक्रम नोंदवला. यासंदर्भात त्यांचे वडील सुनील बिरारी सांगतात की, जुळे भावंडं असले तरी त्यांच्या आवडी-निवडी फार सारख्या नाहीत. त्यांची उंचीदेखील वेगळी आहे. मात्र, दोघेही अभ्यासू आहेत. त्यामुळे त्यांना विविध विषयांत मिळणारे गुण आणि टक्केवारी यात फार फरक नाही, असेही त्यांनी सांगितले. सुनील बिरारी हे मूळचे कळवण तालुक्यातील पाष्टे येथील रहिवासी आहेत.दोघा जुळ्या भावडांना एकसारखे गुण मिळाल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे. मात्र दोन्ही भावंडांची वेगवेगळ्या विषयात रुची आहे. ओमला संरक्षण क्षेत्रात जायचे असून, शिवानीला मात्र वैद्यकीय क्षेत्राकडे कले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी