सुरेगावच्या सरपंचपदी वसंत इलग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 23:40 IST2016-03-21T23:05:46+5:302016-03-21T23:40:05+5:30
सुरेगावच्या सरपंचपदी वसंत इलग

सुरेगावच्या सरपंचपदी वसंत इलग
सिन्नर : तालुक्यातील सुरेगावच्या सरपंचपदी वसंत वामन इलग यांची बिनविरोध निवड झाली.
इंद्रभान मोहन सांगळे यांनी सहकारी सदस्याला संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी मंडल अधिकारी तथा निवडणूक अधिकारी व्ही. व्ही. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक पार पडली.
सरपंचपदाच्या निवडणुकीत वसंत इलग यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक अधिकारी गोसावी यांनी इलग यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
मावळते सरपंच चंद्रभान सांगळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच वसंत इलग यांचा सत्कार करण्यात
आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, सुनीता देशमुख, सुनीता इलग, कांताबाई भालेराव, आशा इलग, ग्रामसेवक एस. जे. शिरसाठ, व्ही. पी. वर्पे आदि सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच इलग यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
करण्यात आला. यावेळी पुंजा इलग, विलास देशमुख, शरद इलग, ज्ञानेश्वर इलग, शिवाजी इलग, चिंतामण इलग, दादा भालेराव, रमेश इलग, संतोष देशमुख, भाऊसाहेब भालेराव, बाळू भालेराव, दीपक पाटोळे, रामनाथ सांगळे, गोकुळ राजे, राहुल इलग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)