सुरगाणा : पळशेत जवळील घटना

By Admin | Updated: January 8, 2015 01:09 IST2015-01-08T01:09:24+5:302015-01-08T01:09:42+5:30

सुरगाणा : पळशेत जवळील घटना

Surgana: Nearby events near Palshet | सुरगाणा : पळशेत जवळील घटना

सुरगाणा : पळशेत जवळील घटना

सुरगाणा : जनावरांची बेकायदा वाहतूक करणारा आयशर ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात सहापेक्षा जास्त गायींचा जागीच मृत्यू झाला तर अन्य गायी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान तालुक्यातील पळशेत जवळील घाटातील खोल दरीत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर आयशर ट्रकमध्ये (क्र. एम.एच.०४ जीसी४४१७) २० पेक्षा जास्त जनावरे भरून जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक मेरदहाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंभर ते दिडशे फूट खोल दरीत जाऊन कोसळला. झालेल्या या भाषण अपघातात सहापेक्षा जास्त गायींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
ट्रकचालक व अन्य सहकारी फरार झाले. सकाळी अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश पारधी व उपनिरीक्षक अशोक गवळी हे पथकासह तातडीने अपघातस्थळी पोहचून जखमी गायींवर उपचारासाठी पशुवैद्यकिय अधिकारींनी बोलावून घेतले आणि चारा-पाण्याची व्यवस्था पोलिस पाटील यांच्या मदतीने करून घेतली. मुक्या जनावरांचा अशा रितीने झालेल्या मत्यूने अपघातस्थळी असलेल्या सर्वांचेच हृदय पिळवटून गेले. योग्य तो तपास करून दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सुरेश पारधी यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Surgana: Nearby events near Palshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.