शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन उपचारासाठी मुंबईस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:33 IST

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

नाशिक : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने मंगळवारी (दि. २२) त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मंगळवारी दुपारी जैन यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या तसेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाबरोबरच रक्तदाबदेखील वाढला होता. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण २९७ पर्यंत वाढल्याचे आढळले होते. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. विशेषत: रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे उपचार वैद्यकीय अधिकाºयांनी केले. मात्र याच दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचेदेखील आढळले होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तातडीने मुंबईस पुढील उपचारासाठी पाठविण्याचा सल्ला दिला. कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता होणे बाकी असल्याने मंगळवारी (दि.२२) सायंकाळी त्यांना पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. बुधवारी (दि.२३) कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर त्यांना दुपारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी त्यांना ३० आॅगस्ट रोजी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. त्यांचे वय ७७ असून, वयोमानामुळे ते अशक्त झाले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी हृदयविकारामुळे शस्त्रक्रिया-देखील करावी लागली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरjailतुरुंग