कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे ग्रामपालिकेवर सलग तिसऱ्यांदा महिलाराज दिसून येणार आहे. ग्रामपालिकेचे सरपंचपद महिलेकडे असतानाच आता पुन्हा तिसऱ्यांदा उपसरपंचपदी सुरेखा विजय औसरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या पंधरवड्यात मावळत्या उपसरपंच ज्योती राजाराम भंडारे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला होता. तेव्हापासून उपसरपंचपद रिक्त होते. सोमवारी (दि.२७) ग्रामपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा सरपंच गीता गोतरणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी सूचक म्हणून सोमनाथ भागवत यांनी तर अनुमोदक म्हणून छगन जाधव यांनी स्वाक्षरी केली. एकमेव अर्ज आल्याने सुरेखा विजय औसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी मावळत्या उपसरपंच ज्योती भंडारे, ग्रामपालिकेचे ग्रामसेवक रवी अहिरे, संचालक छगन जाधव, अवेदा सैय्यद अली, छबू काळे,सविता जाधव, बाळू कर्डक, छाया गांगुर्डे, शिल्पा जाधव, अतुल पाटील, सरला धुळे, सोमनाथ भागवत, ज्योती भंडारे, सुहास भार्गवे, मनीषा भंडारे, धनराज भंडारे व रमेश जाधव हे सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदाची निवड होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.फोटो- २७ सुरेखा औसरकर
कसबे सुकेणे ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी सुरेखा औसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 19:41 IST
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे ग्रामपालिकेवर सलग तिसऱ्यांदा महिलाराज दिसून येणार आहे. ग्रामपालिकेचे सरपंचपद महिलेकडे असतानाच आता ...
कसबे सुकेणे ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी सुरेखा औसरकर
ठळक मुद्दे ग्रामपालिकेवर सलग तिसऱ्यांदा महिलाराज