शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात रविवारी जलपरिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:20 IST

नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी ( २ ) रोजी सुरगाणा तालुक्यातील जाहुले येथे जलपरिषद आयोजित करण्यात आली आहे.

पेठ : नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी ( २ ) रोजी सुरगाणा तालुक्यातील जाहुले येथे जलपरिषद आयोजित करण्यात आली आहे.या वर्षी सर्वाधिक दुष्काळाचे चटके पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांना बसले. सरासरी इतका पाऊस पडूनही जवळपास सर्वच गावांना मे मिहण्यात पिण्याचे पाणी मिळत नाही. शासकिय योजना राबवल्या जात असल्या तरी योग्य निर्णय व समन्वयाचा अभाव यामुळे अनेक पाणी योजना धुळ खात पडून आहेत. यासाठी स्थानिक जनता, शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनीधी व सामाजिक संस्थांना एकाच व्यासपिठावर आणून ठोस उपाययोजना तयार करण्यासाठी या जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आदिवासी भागातील सर्वच गावांना पाणीटंचाईने घेरले असून रात्री अपरात्री महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.म्हणून या जलपरिषद साठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे सह स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई