सुरगाणा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे

By Admin | Updated: July 12, 2014 00:30 IST2014-07-11T22:35:38+5:302014-07-12T00:30:15+5:30

सुरगाणा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे

Surangaa Taluka Gram Panchayat Employees' Team | सुरगाणा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे

सुरगाणा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे

सुरगाणा : तालुक्यातील ग्रामपंचायत संघटनेतर्फे १५ जुलैतर्फे पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका गंगाराम चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनात तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींमधील सर्वच कर्मचारी सहभागी होणार आहेत.
संघटनेच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. ग्रामपंचायत कर्मचारी सुधारित वेतन, विशेष राहणीमान, भत्ता व इतर सेवा सवलतीची अंमलबजावणीसाठी आंदोलन केले जाणार आहे. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सामावून घेऊन परिमंडळनिहाय किमान वेतन लागू करून सध्या लागू असलेला राहणीमान भत्त्यासह एकत्रित वेतन अदा करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता शासनस्तरावरून अद्यापही केली जात नाही. कर्मचाऱ्यांना विविध सेवा सवलतींची अंमलबजावणी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत करावी. शासन निर्णयाची अधिकारीवर्गाकडून पायमल्ली होत आहे. शासनातर्फे हा अन्याय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Surangaa Taluka Gram Panchayat Employees' Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.