सुरज निकला मिटा अंधेरा; देखो बच्चो हुआ सवेरा
By Admin | Updated: November 16, 2016 22:20 IST2016-11-16T22:20:43+5:302016-11-16T22:20:07+5:30
बालदिन : शहरातील विविध शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सुरज निकला मिटा अंधेरा; देखो बच्चो हुआ सवेरा
नवरचना विद्यालय
गंगापूररोड : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनिता अहिरे, आशा वायकंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी यांनी केले. नेहरूंच्या जीवनपटाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकट केली. चंद्रकला बोरस्ते व भवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रीती चौधरी, गीता बोगडे आदिंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
बालशिक्षण मंदिर
बालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात व विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वाती काळे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमप्रसंगी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी नेहरूंच्या वेशभूषेत उपस्थित होते. यानिमित्ताने शाळेत वर्गवार बालगीत व इतर स्पर्धांचे आयोजन करून प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रंजना देवरे, अर्चना वाळके, मनीषा मते, धनेश्वरी आवारे, संगीता वाटपाडे, उज्ज्वला जोंधळे, छाया सोनवणे आदि उपस्थित होते.
सार्वजनिक वाचनालय
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन, साने गुरुजी कथामालेतर्फे बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष नरेश महाजन, कर्नल आनंद देशपांडे, गिरीश नातू, वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद, बालवाचक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.