सटाण्यात विविध संघटनांचा पाठिंबा

By Admin | Updated: September 23, 2016 01:00 IST2016-09-23T00:58:51+5:302016-09-23T01:00:12+5:30

बैठक : डॉक्टर, वकील, शेतकरी संघटनेचा पाठिंबा जाहीर

Support of various organizations in the community | सटाण्यात विविध संघटनांचा पाठिंबा

सटाण्यात विविध संघटनांचा पाठिंबा

सटाणा : मराठा क्र ांती मूक मोर्चाला शहरातील मुस्लीम समाज व तेली समाजाबरोबरच डॉक्टर असोसिएशन, वकील संघाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला. शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी झालेल्या मेळाव्यात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
आज गुरूवारी सटाणा वकील संघाच्या हॉलमध्ये रामचंद्रबापू पाटील, काका रौंदळ, ज. ल. पाटील, अरविंद सोनवणे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, वसंतराव सोनवणे, नितीन चंद्रात्रे, सतीश चिंधडे, मधुकर सावंत यांची भेट घेऊन संघाच्या सदस्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाच्या सदस्यांनी मोर्चात सहभागी होऊन एकमुखी पाठिंबा जाहीर केला. तसेच डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकारी डॉ.विलास बच्छाव, डॉ. मनोहर सोनवणे, डॉ.प्रकाश जगताप, डॉ. दिग्विजय शहा, डॉ. अतुल जाधव, कुलदीप जाधव, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. अमोल पवार, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. श्यामकांत जाधव, जयवंत महाले, शशिकांत कापडणीस यांनी बैठक घेऊन पाठिंबा दिला .
मराठा क्र ांती मोर्चास सटाणा शहरातील मुस्लरम बांधवांनी पाठिंबा दिला असून, याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. राज्यातील मराठा समाज पहिल्यांदा आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला असून, मराठा समाजाच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे मुस्लीम बांधवांनी म्हटले आहे. राज्य शासनाने न्यायालयासमोर मराठा समाजाची बाजू मांडून लवकरच मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले
आहे.
कोपर्डी येथील पीडित भगिनीला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदि मागण्यांसाठी नाशिक येथे लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्र ांती मोर्चा संपन्न होत असून, राज्य शासनाला निश्चित याची दखल घ्यावी लागेल. आम्ही सर्व मुस्लीम समाजबांधवांनी मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला सशर्त पाठिंबा देत आहोत, असे पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.
तसेच सटाणा तेली समाजाचे दत्तात्रेय सोमनाथ पवार, अरुण सोनवणे, सुनील जाधव, तुषार गाडेकर, हेमंत नेरकर, राजेंद्र वाघ, तुषार सूर्यवंशी, शशिकांत बिरारी, विश्वनाथ जाधव, राजाराम जाधव, केशव जाधव आदि पदाधिकाऱ्यांनी मराठा मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला आहे.
शहरातील स्वामी समर्थ मंदिरात नववसाहत भागातील नागरिकांनी बैठक बोलावून सर्वच समाजबांधवांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, अरविंद सोनवणे, लालचंद सोनवणे, मनोहर देवरे, किशोर भामरे, पांडुनाना सोनवणे, जे. टी. सूर्यवंशी, सचिन भामरे, दीपक रौंदळ, अमर रौंदळ, संग्राम भामरे, भावेश भामरे, पिंटू बागुल, धीरज बागुल, राहुल पाटील, पिंटू सूर्यवंशी, डॉ. मनीष सूर्यवंशी, जीवन ठाकरे, बबलू रौंदळ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Support of various organizations in the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.