भुजबळ समर्थन मोर्चाला वंजारी, सुतार, लोहार संघाचा पाठिंबा
By Admin | Updated: September 28, 2016 23:37 IST2016-09-28T23:36:35+5:302016-09-28T23:37:05+5:30
भुजबळ समर्थन मोर्चाला वंजारी, सुतार, लोहार संघाचा पाठिंबा

भुजबळ समर्थन मोर्चाला वंजारी, सुतार, लोहार संघाचा पाठिंबा
नाशिक : माजी उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे ३ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र वंजारी सेवा संघ व महाराष्ट्र सुतार-लोहार संघ नाशिक यांनी पाठिंबा जाहीर केला
आहे. मागासवर्गीय व बहुजन समाजाचे नेते अशी ओळख असेलेल्या छगन भुजबळ यांच्यावर सध्या अन्याय होत असल्याची भावना मागासवर्गीयांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी वंजारी, सुतार-लोहार संघाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नंदाजी कांगणे, महाराष्ट्र सुतार-लोहार संघ नाशिकचे सुदाम खैरनार, राजेंद्र शिरसाठ यांनी पाठिंब्याचे पत्र मोर्चाच्या नियोजन समितीकडे सोपविले आहे. भुजबळ यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठकांचे नियोजन करण्यात आले असून, मोर्चासाठी समिती तयार केली जात आहे. (प्रतिनिधी)