सटाणा पोस्ट कार्यालयात आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:22+5:302021-08-27T04:19:22+5:30

मोबाईल लिंक सुविधेचा शुभारंभ सटाणा : शहरातील पोस्ट कार्यालयात नवीन सुरू झालेल्या आधार मोबाईल लिंक इन सुविधेचा प्रारंभ आमदार ...

Support at the Santana Post Office | सटाणा पोस्ट कार्यालयात आधार

सटाणा पोस्ट कार्यालयात आधार

मोबाईल लिंक सुविधेचा शुभारंभ

सटाणा : शहरातील पोस्ट कार्यालयात नवीन सुरू झालेल्या आधार मोबाईल लिंक इन सुविधेचा प्रारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा उपस्थित होते.

ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून व आधारच्या कामासाठी होणारी धावपळ थांबविण्यासाठी डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून दिनांक २३ ऑगस्टपासून आधार कार्डला मोबाईल ई-मेल लिंक करण्यासाठी योजना राबविली असून, यात ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.

याआधी पोस्ट विभागाने जनतेसाठी इंडियन पोस्टल पेमेंट बँकच्या माध्यमातून कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून पैसे प्रति दिवस दहा हजार रुपये काढून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच आर. डी. एस. बी. सुकन्या अशा अनेक प्रकारच्या योजना पोस्ट खात्याने राबविल्या असून, जनतेने याचा लाभ घेतला आहे.

बागलाणच्या पश्चिम भागातील दुर्गम गावे व पाड्यांवरील नागरिकांसाठी पोस्ट विभागाने विशेष मोहीम राबवून गावागावांत जाऊन आदिवासी बांधवांचे आधार लिंक करून घेण्याची विनंती याप्रसंगी आमदार बोरसे यांनी केली, तर उपविभागीय अधिकारी डी. जी. उमाळे यांना सटाणा विभागातील सटाणा, कळवण, देवळा, तहाराबाद, जायखेडा, आभोणा या उपविभागातील जनतेने शासनाच्या सध्या सुरू असलेल्या व भविष्यात येणाऱ्या ओएनओआरसीसारख्या विविध योजनांचे लाभ, तसेच विद्यार्थ्यांना बँक, तसेच डी-मॅटखती उघडण्यासाठी, स्वत:च्या आधारमध्ये स्वत: किरकोळ बदल करण्यासाठी पोस्ट खात्याने सुरू केलेल्या नवीन योजनेसाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, ज्यांचे आधार मोबाईल नंबरला लिंक नसेल त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसात जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

यावेळी वरिष्ठ निरीक्षक एस. के. पगार, पोस्ट मास्तर पी. के. चव्हाण, वरिष्ठ पी. ए. आर. एन. देवरे, प्रकाश भोसले, धीरज ऐशी, वसंत खैरनार, कृणाल नांदूरकर, डी. बी. चिंचोले, नीलेश जाधव, नीलेश खैरनार, विनोद गुंजाळ, बाळासाहेब जाधव, ऋषिकेश पगार, रमेश बागुल, भास्कर पगार, आदी उपस्थित होते.

(२६ सटाणा)

सटाणा पोस्ट कार्यालयात नवीन सुरू झालेल्या आधार मोबाईल लिंक इन सुविधेचा प्रारंभ प्रसंगी आमदार दिलीप बोरसे, समवेत बिंदू शर्मा, डी. जी. उमाळे, एस. के. पगार, पी. के. चव्हाण, आर. एन. देवरे, प्रकाश भोसले, धीरज ऐशी, वसंत खैरनार, कृणाल नांदूरकर, डी. बी. चिंचोले, आदी उपस्थित होते.

260821\26nsk_26_26082021_13.jpg

सटाणा पोस्ट कार्यालयात नवीन सुरू झालेल्या आधार मोबाईल लिंक इन सुविधेचा शुभारंभ प्रसंगीआमदार दिलीप बोरसे समवेत बिंदू शर्मा, डी.जी. उमाळे, एस. के. पगार, पि. के. चव्हाण, आर. एन. देवरे, प्रकाश भोसले, धीरज ऐशी, वसंत खैरनार, कृनाल नांदूरकर, डी. बी. चिंचोले आदी.

Web Title: Support at the Santana Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.