पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हास्तरावर आधार निधी
By Admin | Updated: February 6, 2016 00:25 IST2016-02-06T00:22:47+5:302016-02-06T00:25:29+5:30
शोकसभेत आमदार द्वयींचे आश्वासन

पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हास्तरावर आधार निधी
नाशिकरोड : असंरक्षित पत्रकारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या निराधार कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जिल्हा स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार बाळासाहेब सानप व योगेश घोलप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसभेत
दिले.
दत्तमंदिर चौक येथील ऋतुरंग भवनात गुरूवारी सायंकाळी दिवंगत युवा पत्रकार दत्ता कपिले, महेश मोरे, प्रवीण खरोटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात तीन पत्रकारांच्या झालेल्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जिल्हा स्तरावर ठरावीक निधी असावा. छायाचित्रकार, व्हिडीओ, जर्नलिस्ट, कॅमेरामन अशा सर्व घटकांतील पत्रकार क्षेत्रातील कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची सोय असावी अशी भावना व श्रद्धांजली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच लोकप्रतिनिधींचा निधी एकत्रित करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर कमिटी असावी. अशा मागणीचा ठराव करीत या मागणीचा पाठपुरावा अखेरपर्यंत करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, माजी महापौर दशरथ पाटील, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर,प्रभाग सभापती केशव पोरजे, प्रा. कुणाल वाघ, संभाजी मोरूस्कर,शैलेश ढगे, वैशाली दाणी, प्राचार्य राम कुलकर्णी, प्रशांत दिवे, श्रीनिवास लोया, मनोहर कोरडे, अॅड. दीपक बर्वे, ज्ञानेश्वर जुंद्रे, जयंत गाडेकर, सुनील आडके, सुभाष घिया, बंटी कोरडे, प्रशांत कापसे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्यात. (प्रतिनिधी)