शेतकरी संपाचे समर्थन; सिटूच्या वतीने निदर्शने

By Admin | Updated: June 3, 2017 00:14 IST2017-06-03T00:07:52+5:302017-06-03T00:14:49+5:30

सातपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सिटू युनियनच्या वतीने पाठिंबा दर्शवित सरकारच्या विरोधात भर पावसात निदर्शने करण्यात आली.

Support for farmers' strike; Demonstrations on behalf of CITU | शेतकरी संपाचे समर्थन; सिटूच्या वतीने निदर्शने

शेतकरी संपाचे समर्थन; सिटूच्या वतीने निदर्शने


सातपूर : विविध मागण्यांसाठी गुरु वारी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सिटू युनियनच्या वतीने पाठिंबा दर्शवित सरकारच्या विरोधात भर पावसात निदर्शने करण्यात आली. कर्जमाफी व शेती मालाला हमी भाव मिळावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देत सिटू युनियनच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भर पावसात निदर्शने करत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. गरवारे चौक, वाडीवऱ्हे, द्वारका चौक, महिंद्रा अँड महिंद्रा सर्कल याठिकाणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, तुकाराम सोनजे, युवराज पाटील,अशोक लहाने, सिंधू शार्दुल आदिंसह विविध कारखान्यातील कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Support for farmers' strike; Demonstrations on behalf of CITU