भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसींचा सिडकोत मेळावा
By Admin | Updated: September 28, 2016 01:17 IST2016-09-28T01:17:04+5:302016-09-28T01:17:23+5:30
भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसींचा सिडकोत मेळावा

भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसींचा सिडकोत मेळावा
सिडको : माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सरकारने आकसापोटी कारवाई केली असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवारांकडून करण्यात आले. विशेष म्हणजे नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चात माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आकसपोटी असून, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी संघटनांकडून येत्या ३ आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विनंती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सिडकोतील शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात आज भुजबळ समर्थकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोर्चात सर्व ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी करण्यात आले. यावेळी बाजीराव तिडके, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, अंबादास खैरे, संतोष सोनपसारे, संतोष कमोद, पुंजाराम गामणे, वामनराव जेजूरकर, अॅड. नितीन सानप, ज्ञानेश्वर जायभावे, संदीप जगझाप, बाळासाहेब सोनवणे, बाळा दराडे, सतीश खैरणार, अनिल आठवले, मंदाकिनी जाधव, शिवाजी बरके, नितीन माळी, साहेबराव गांगुर्डे, संदीप वानखेडे आदिंनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ येत्या तीन आक्टोबरच्या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड हे ओबीसींच्या पाठीशी उभे राहणार असून, या मोर्चात जितेंद्र आव्हाड युवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)