दिंडोरी कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST2021-05-22T04:15:09+5:302021-05-22T04:15:09+5:30
दिंडोरीत ऑक्सिजन बेड कोविड सेंटरचे उदघाटन विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष ...

दिंडोरी कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा
दिंडोरीत ऑक्सिजन बेड कोविड सेंटरचे उदघाटन विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यापूर्वी या कोविड सेंटरसाठी परनार्ड रीकार्ड प्रा.लिमिटेड च्या वतीने उत्कृष्ट प्रतीचे ५० परिपूर्ण फॉवलेर हॉस्पिटल बेड (खाटा, गादी, उशी) देण्यात आले आहेत.
यावेळी प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी तालुक्यातील विविध कंपनीना कोविड सेंटर ला मदत करण्याचे आवाहन केले होते. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ऑक्सिजनची गरज लक्षात घेता. प्रशासनाच्या आवाहनाला परनार्ड रिकार्ड कंपनी ने प्रतिसाद देत तात्काळ एका ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी करार करून दिंडोरी कोविड सेंटर साठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे.
===Photopath===
210521\img-20210521-wa0105.jpg
===Caption===
फोटो- दिंडोरी येथील कोविड सेंटर साठी परनार्ड रिकार्ड कंपनी कडून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर पोहच करतांना कर्मचारी