निऱ्हाळे येथे बंधाऱ्यात बुडून वकिलाचा मृत्यू

By Admin | Updated: October 20, 2016 00:38 IST2016-10-20T00:34:53+5:302016-10-20T00:38:44+5:30

निऱ्हाळे येथे बंधाऱ्यात बुडून वकिलाचा मृत्यू

Supervision of dysfunction in the cemetery in the reservoir | निऱ्हाळे येथे बंधाऱ्यात बुडून वकिलाचा मृत्यू

निऱ्हाळे येथे बंधाऱ्यात बुडून वकिलाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातल्या निऱ्हाळे येथील बंधाऱ्यात बुडून तरुण वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निऱ्हाळे येथील अ‍ॅड. चंद्रशेखर रामचंद्र यादव (४२) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले होते. शेतातून काम करणाऱ्या काही जणांना बंधाऱ्याजवळ कपडे आढळून आले. त्यानंतर यादव यांचे बंधू व ग्रामस्थांनी बंधाऱ्यातील पाण्यात शोध घेतल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अ‍ॅड. चंद्रशेखर यादव यांचा पाण्यात मृतदेह आढळून आला. बुधवारी सकाळी निऱ्हाळे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे, दशरथ मोरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Supervision of dysfunction in the cemetery in the reservoir