कळवण : चमत्कारामागचे वैज्ञानिक सत्य जाणून बुवाबाजीचे ढोंग उघडकीस आणावे, अशिक्षितांचे शोषण थांबविण्यासाठी चळवळ वाढविण्यास हातभार लावावा, त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे गरजेचे असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी व्यक्त केले.कळवण येथील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीव व जनजागृती या विषयावर व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार होते. यावेळी चमत्काराच्या विविध प्रयोगांच्या सादरीकरणासह वैज्ञानिक जाणीव वाढविण्याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक प्राचार्य एल.डी. पगार यांनी केले.यावेळी कळवण तालुका अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. उमेश कापडणीस, उपमुख्याध्यापक एन. डी. देवरे, प्र. उपप्राचार्य एस. पी. बागुल, प्रा. एच. आर. गवळी, प्रा. आर. बी. बोडके, प्रा. नीता निकम, प्रा. कल्याणी जाधव उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. एकनाथ बच्छाव यांनी केले. आभार एन. एन. आहेर यांनी मानले.
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:19 IST