सुपरक्रॉस लीग पहिल्या फेरीत टीम भल्ला रॉयल विजयी
By Admin | Updated: November 10, 2014 00:15 IST2014-11-10T00:14:18+5:302014-11-10T00:15:29+5:30
सुपरक्रॉस लीग पहिल्या फेरीत टीम भल्ला रॉयल विजयी

सुपरक्रॉस लीग पहिल्या फेरीत टीम भल्ला रॉयल विजयी
नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील सिएट पुणे इन्व्हिटेशनल सुपर मोटोक्रॉस लीगच्या पहिल्या फेरीत टीम भल्ला रॉयलने सर्वाधिक १५३ गुण मिळवत विजय संपादन केला, तर संपूर्ण लीगसाठी सर्वात मोठी आघाडी घेतली आहे़ या स्पर्धेत दोन गटांत भारताचा रायडर हरिथ नोहा व नाशिकचा गणेश लोखंडे प्रत्येकी ४० गुण घेत आघाडीवर राहिले़ पाथर्डीगाव रोडवरील कुटे सुपरक्रॉस ट्रॅक येथे सुपरक्रॉस लीगच्या पहिल्या फेरीस महापौर अशोक मुर्तडक व शैलेश कुटे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला़ सुपरक्रॉस लीगमध्ये १३४ गुण मिळवत अरान्हा रेसिंग टीम द्वितीय क्रमांकावर राहिली, तर १३० गुण मिळवत एसकेपी हायरोलर्स रेसिंग संघ तृतीय स्थानी राहिला़ एमएक्स-१ रेसमध्ये हरिथ नोहा ४० गुण घेऊन प्रथम, ३२ गुण मिळवत ईशान दशनायका व प्रमोद जोशव्हा यांनी द्वितीय स्थान मिळवले़ एमएक्स-२ रेसमध्ये गणेश लोखंडे ४० गुण घेऊन आघाडीवर राहिला़ प्रिन्स सिंग हा ३० गुण घेऊन दुसऱ्या, तर २७ गुण मिळवत सुरेश राठोड तिसऱ्या स्थानी राहिला़ एमएक्स-३ रेसमध्ये समिम खान व यश पवार यांनी समान ३७ गुण मिळवत प्रथम क्रमांक राखला़ २६ गुण मिळवत अमिर दळवी द्वितीय, तर २५ गुण मिळवून विनीत कुरूप तिसरा आला़ एमएक्स-४ मध्ये ४० गुण मिळवत आर. नटराज प्रथम स्थानी राहिला़ ३४ गुण मिळवत नरेशकुमार द्वितीय, तर २६ गुण मिळवणारा असिफ अली तृतीय स्थानी राहिला़