मेशी परिसरात उन्हाचा प्रकोप
By Admin | Updated: April 6, 2015 00:51 IST2015-04-06T00:51:13+5:302015-04-06T00:51:47+5:30
मेशी परिसरात उन्हाचा प्रकोप

मेशी परिसरात उन्हाचा प्रकोप
मेशी : मेशीसह परिसरात चैत्र वणव्यात उन्हाने कहर केला असून परिसरातील तापमान ४० अंशाच्या वर पोहचले असुन पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. वैशाख वणव्याच्या अगोदर सुरू झालेल्या उन्हाच्या प्रकोपाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विहिरींनी तळ गाढला असुन चाराटंचाई, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीचे आवर्तन लवकर द्यावे व गिरणा उजव्या कालव्यालाही गिरणा नदीचे पाणी सोडावे अशी मागणी सर्वत्र होत आहे. संपूर्ण देवळा तालुक्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. देवळा, नऊ गाव पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद आहे. त्यामुले आरक्षीत चणकापूरचे पाणी गिरणा नदीस लवकरात लवकर सोडावे व देवलावासीयांची तृष्णा भागवावी तसेच गिरणा उजव्या कालव्यालाही पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील पाणीटंचाई काही अंशी दुर कालव्यालाही पाणी सोडल्यास लाभक्षोतील पाणीटंचाई काही अंशी दुर होईल अशी मागणी नागरीक करीत आहेत.(वार्ताहर)