नाशिकमध्ये ‘सुन्नी इज्तेमा’

By Admin | Updated: April 16, 2017 15:38 IST2017-04-16T15:38:53+5:302017-04-16T15:38:53+5:30

शहाजहांनी ईदगाह मैदानावर (धार्मिक मेळावा) सुन्नी इज्तेमाला सकाळी दहा वाजता दुसऱ्या दिवसाच्या सत्राला प्रारंभ

Sunni Ijtema in Nashik | नाशिकमध्ये ‘सुन्नी इज्तेमा’

नाशिकमध्ये ‘सुन्नी इज्तेमा’


नाशिक : येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर (धार्मिक मेळावा) सुन्नी इज्तेमाला सकाळी दहा वाजता दुसऱ्या दिवसाच्या सत्राला प्रारंभ करण्यात आला.
सुन्नी दावत-ए-इस्लामी या मुस्लीम धार्मिक संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१६) महिलांचे सत्र पार पडले. रविवारी पुरूषांच्या सत्राने दोन दिवसीय विभागीय इज्तेमाचा समारोप रात्री दहा वाजता होणार आहे. इज्तेमाला स्थानिक धर्मगुरूंसह मुंबई, मालेगाव, धुळे, औरंगाबाद येथूनही धर्मगुरू दाखल झाले आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंत समाजबांधवांची संख्या कमी होती; मात्र संध्याकाळनंतर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या इज्तेमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कमरु ज्जमा खान आजमी उपस्थित राहणार आहे. रात्री आठ वाजता त्यांचे प्रवचन सुरू होणार आहे. तत्पुर्वी मौलाना सय्यद अमिनुल कादरी, मौलाना कारी रिजवान, मौलाना शाकीर अली नुरी आदि धर्मगुरू आपल्या विशिष्ट शैलीमध्ये मार्गदर्शन करणार आहे.

Web Title: Sunni Ijtema in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.