सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST2021-07-29T04:15:05+5:302021-07-29T04:15:05+5:30

शहराच्या पश्चिम भागातील पांडुरंग नगर परिसरात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि मनीषा पवार या सासू-सुना शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर पाणी ...

Sune also drowned while trying to save her mother-in-law | सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू

सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू

शहराच्या पश्चिम भागातील पांडुरंग नगर परिसरात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि मनीषा पवार या सासू-सुना शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या विहिरीला कठडा नाही. पाणी काढत असताना सासू गयाबाईचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. सासू विहिरीत पडल्याचे पाहून सून मनीषाने आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मनीषाने साडीचा पदर विहिरीत सोडून सासूला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न करत असताना तीदेखील विहिरीत पडली. दोघींनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयत मनीषा हिला आठ वर्षांचा मुलगा, सहा व चार वर्षांच्या दोन मुली आहेत. तिच्या निधनाने तीन बालकांचे मातृछत्र हरवले आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Sune also drowned while trying to save her mother-in-law