शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सुंदरनारायण मंदिरावर नववर्षात चढणार कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:33 IST

पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण्याची पुरातत्व विभागाची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिलाच प्रकल्प : नूतनीकरणाला लागणार बारा महिने

नाशिक : पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण्याची पुरातत्व विभागाची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. अशा पद्धतीने बांधकाम करण्यात येणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यात गर्भगृहाच्या बाह्य बाजूच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम २०१९ अखेर पूर्णत्वास येणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे.गोदाकाठावर अनेक लहान-मोठी पुरातन मंदिरे आजही बघावयास मिळतात. त्यापैकी एक सुंदरनारायण. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. मंदिराची पडझड रोखण्यसाठी सुंदरनारायण मंदिराच्या संरक्षित वास्तूचे नूतनीकरणाचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.यासाठी शासनाने सुमारे१२.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या गर्भगृहाचे जुने दगड उतरविण्यात आले आहे. गर्भगृह, शिखर दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम २०१९अखेर पूर्ण केले जाणार आहे.पेशवेकालीन अद्भुत मंदिरपेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या मंदिरांपैकी एक सुंदरनारायण मंदिर आहे. यादवकाळातील मंदिरांच्या तुलनेत या मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड कमकुवत असल्याने पडझड अधिक झाली. नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक दगडांचा वापर यासाठी त्यावेळी केला गेला. पेशवेकालीन मंदिर बांधकाम शैलीचा अद्भुत कलाविष्कार या वास्तूच्या रुपाने शहरात पहावयास मिळतो. मंदिराची संपूर्ण शास्त्रीय रचना पूर्ण करणारी ही वास्तू आहे. शिखर, गर्भगृह तसेच मंडप, मुख मंडप, तीन प्रवेशद्वार या मंदिराला आहे. पेशवेकालीन मंदिर बांधकाम शैलीचा हा सुंदर नमुना असल्यामुळे पुरातत्व खात्याने त्यास संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे.दुसºया टप्प्यातील मंदिराचे उर्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. मंदिराच्या वास्तूचे जे दगड १०० टक्क्यांपेक्षा अधिक निकामी झाले आहेत ते संपूर्णत: बदलण्यात येणार आहेत, तर जे दगड काही प्रमाणात सुस्थितीत आहेत, त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्याअगोदर संपूर्ण वास्तूचे चित्रीकरण करण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे