झिरवाळांच्या पुत्रासह सूनबाई बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:26 IST2021-01-19T20:43:54+5:302021-01-20T01:26:47+5:30

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या ननाशी परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदित उमेदवारांनी ...

Sunbai unopposed with Jirwal's son | झिरवाळांच्या पुत्रासह सूनबाई बिनविरोध

ननाशी परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यावर जल्लोष करताना उमेदवार आणि समर्थक.

ठळक मुद्देवनारे ग्रामपालिका : धनराज महाले यांच्या बंधूंचीही अविरोध निवड

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या ननाशी परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदित उमेदवारांनी बाजी मारली आहे तर काही ठिकाणी जुने आणि नवे असे संमिश्र निकाल लागले आहेत. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र दीपक झिरवाळ आणि स्नुषा वैशाली झिरवाळ यांची वनारे ग्रामपालिकेसाठी तर वारे ग्रामपंचायतीत माजी आमदार धनराज महाले यांचे बंधू यादव महाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. यंदा परिसरातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या असून, बहुतांश ठिकाणी अत्यंत काठावर निकाल लागले असल्याचे चित्रही पाहावयास मिळाले. दरम्यान, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला होता. हा वाढलेला मतदानाचा टक्का काही ठिकाणी नवोदित उमेदवारांना विजयाच्या समीप घेऊन गेला तर काही ठिकाणी हाच वाढलेला टक्का प्रस्थापिताना हादरवून गेला.

ननाशी परिसरातील गांडोळे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग १ मधून भरत भोये, पुष्पा देशमुख, मीरा भोये, प्रभाग २ मधून अंबादास गावित, गंगाधर भोये, रूक्मिणी शिंदे, प्रभाग ३ मधून सुरेश भोये, हौसाबाई भोये, शकुंतला भोये हे विजयी झाले आहेत. बाडगीचापाडा येथे प्रभाग १ मधून जगदीश गावित, रोहिणी गावित, प्रभाग २ मधून सोमनाथ हिंडे, लता पवार, लीला हिंडे, प्रभाग ३ मधून सुदाम पवार, पल्लवी पवार हे विजयी झाले आहेत. आंबाडमध्ये प्रभाग १ मधून मधुकर चौधरी, विमल चौधरी, काशीबाई गायकवाड, प्रभाग २ मधून दत्तू गायकवाड, मच्छीन्द्र शेखरे, प्रभा शेखरे, प्रभाग ३ मधून तानाजी गावित, वैशाली गायकवाड, तुळसा गायकवाड विजयी झाले आहेत. महाजे ग्रामपालिकेत प्रमोद कोंगे, विजय कोंगे, आशा गुंबाडे, प्रभाग २ मधून वसंत भोये, जिजाबाई भोये, रुपाली भोये तर प्रभाग ३ मधून सावळीराम भुसारे हे विजयी झाले आहेत. याच प्रभागातून कविता इंगळे आणि कमळाबाई भुसारे या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

पिंपळगाव धूममध्ये प्रभाग १ मधून धनाजी काशीद, सुनीता बेझेकर, चंद्रभागा बेझेकर, प्रभाग २ मधून राजू गायकवाड, कापसाबाई गायकवाड, प्रभाग ३ मधून राकेश गुंबाडे हे विजयी झाले आहेत तर याच प्रभागातून नंदा गायकवाड यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. वणी खुर्दमध्ये प्रभाग १ मधून सिकंदर जाधव, रोहिदास रहेरे, संगीता धुळे, प्रभाग २ मधून केशव गावित, निर्मला शेवरे, आशा रहेरे तर प्रभाग ३ मधून राहुल ढगे, सरला चौधरी, ललिता चौधरी हे विजयी झाले आहेत. दरम्यान जोरण येथील निवडणूक यावेळी बिनविरोध झाली आहे.

 

Web Title: Sunbai unopposed with Jirwal's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.