पंचवटी : उन्हाच्या झळा वाढल्यामुळे नागरीकांना उकाडयाचा सामना करावा लागत आहे. दुपारच्यावेळी जाणवणार्या अस उकाडयापासून बचाव व्हावा करता यावा यासाठी सध्या युवक वर्ग रामकुंड, गांधीतलाव तसेच फुलेनगर व हिरावाडी परिसरात असलेल्या पाण्याच्या पाटात अंघोळ करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दैनंदिन दुपारच्यावेळी दिसुन येत आहे. सध्या शाळांना उन्हाळी सुया असल्याने व त्यातच उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे युवकांच्या झुंडी नदीपात्रात तासनतास अंघोळीसाठी गर्दी करीत आहेत. नदीपात्राला व पाटाला वाहते पाणी सोडलेले असल्याने वाहत्या पाण्यात पोहणच्याची मजा काही वेगळीच असते असे म्हणून अनेक नवशिखे तरूण जलतरूण पूंकडून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. दुपारी बारा वाजेनंतर कडाक्याचे उन जाणवत असल्याने युवक दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नदीपात्रात मनसोक्तपणे अंघोळ करण्याच्या कामात मग्न झाल्याचे चित्र दिसते. नदीपात्राला वाहते पाणी असल्याने अनेक बालगोपाळ तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी दुपारी हमखास नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गर्दी करतात. शाळा तसेच काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्याने दुपारच्यावेळी काहीतरी टाईमपास म्हणून अनेक जणांची पावले नदीपात्राकडे वळत असल्यामुळे नदीपात्र दुपारी बालगोपाळ तसेच युवकांच्या गर्दीने भरगच्च होत आहे. (वार्ताहर)
उन्हाच्या झळा वाढल्या
By admin | Updated: May 7, 2014 21:59 IST