शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:39 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. ...

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : बळीराजा हवालदिल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिसरात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे शेती डिसेंबर अखेरपर्यंत ओलिताखाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून अतिपाववसाने बाधित झालेली शेती लागवडीखाली आणली. त्यात उन्हाळ कांद्याची लागवड केली. यंदा परिसरात झालेली कांदा लागवड टप्प्याटप्प्यानेझाली असून, पहिल्या व दुसºया टप्प्यातील कांद्याची लागवड झाली ती आज काढणी सुरु आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी निघाले आहे. यात बहुतेक शेतकरी हा कांदा विक्री करत आहे तर काही शेतकरी कांदाचाळीत साठवत आहे. तिसºया टप्प्यातील कांदा लागवड ही करपा रोगाला बळी पडली असून तो कांदा परिपक्व नसल्याने तो चाळीत साठविता येणार नाही. त्यामुळे यंदा तरी परिसरात कांदा उत्पादन घटले असून चाळीत साठवणूकदेखील कमी प्रमाणात होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खर्च गेला वायायंदा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती उपळून निघाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे केलेले मका पीक वाया गेले. त्यानंतर शेतीत डिसेंबर अखेरपर्यंत पाणी होते. शेतकºयांनी शेतजमीन तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून शेती उन्हाळ कांद्याच्या लागवडीयोग्य बनवली व त्यात उन्हाळ कांदा लागवड केली. ही लागवड शेवटच्या टप्प्यातील असून, लागवड केलेल्या कांद्याला शेतकरी बांधवांनी मोठे आर्थिक भाग भांडवल लावले. कांदा कुठल्याही रोगाला बळी पडू नये यासाठी रोगप्रतिबंधक फवारण्याही केल्या, परंतु गेल्या दहा दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याने ही तिसºया टप्प्यातील व उपळट झालेल्या शेतात केलेली सर्व कांदा लागवड करपा रोगाला बळी पडली असून, शेतकºयांचा सर्व खर्च वाया गेला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.शेतकºयांचे अतोनात नुकसान झाल्याने कृषी विभागाकडून या सर्व शेताची पाहणी करून शासनाकडे याबाबत अहवाल पाठवावा. ज्या शेतकºयांचा खरीप व रब्बीही वाया गेला असा शेतकरी सावरावा यासाठी आर्थिक मदत मिळावी.- दादाजी रेवबा जाधव, शेतकरी, पिळकोसकांदा पीक वाचविण्यासाठी टॅँकरने पाणीसायगाव : गावासह परिसरात विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागातील शेतकरी २५ हजार लिटर क्षमतेचे पाणी टँकर तीन हजार रुपये दराने विकत घेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडला. येवला तालुक्यात किमान रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे पीक हमखास निघेल या आशेवर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. पण, फेब्रुवारी महिन्यातच नदी-नाले, छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक झाले. मार्चच्या शेवटी तर गाव परिसरातील विहिरींनीही तळ गाठला. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मशागत, महागड्या दराचे कांदा रोप, लागवड, रासायनिक खते यामुळे कांदा पीक उभे करण्यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागात शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन पिकांना देत आहे. एकरभर कांद्याला एक पाणी द्यायचे म्हटल्यावर चार टँकर लागतात. विकतच्या पाण्यामुळे कांदा उत्पादन खर्चात २० हजार रुपयांची वाढ होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची घसरण बघता कांदा उत्पादकांच्या हाती शिल्लक नफा राहणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार