शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:12 IST

मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. 

ठळक मुद्देभाव मिळण्याची अपेक्षा : ठिबकसह तुषार सिंचनाचा वापर

नाशिक : मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. मागील वर्षी सुरुवातीला कांदा भावात थोडी घसरण झाली होती त्यानंतर मात्र अचानक उसळी घेत कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. यावर्षीही कोरोना संकटा्च्या काळात कांद्याने शेतकऱ्यांना चांगला हात दिला असून उन्हाळ आणि लाल कांद्यालाही चांगला भाव मिळाला. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उतरलेले असले तरी उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु होईपर्यंत दरांमध्ये बदल होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कांद्यासाठी पाणी भरपुर लागत असल्याने ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे अशा बहुसंख्य शेतकऱ्यंनी कांदा लागवड केली आहे. पाणी शेवटपर्यंत पुरावे यासाठी काहींनी थिबक आणि तुषार सिंचनाचाही वापर केला आहे. यावर्षी बियाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. ज्यांनी परजिल्ह्यातील बियाणे आणले अशा काही शेतकऱ्यांची बियाण्यात फसवणुकही झाल्याचे दिसुन येत असून बियाण्यातील भेसळीमुळे काही ठिकाणी कांद्याला डोंगळेच जास्त आले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा