वणीत उन्हाळ कांद्याला १२ हजार रूपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:39 PM2019-12-02T12:39:47+5:302019-12-02T12:39:56+5:30

वणी : येथील उपबाजार आवारात सोमवारी कांद्याला हंगातामील सर्वोच्च १२ हजार रूपये भाव मिळाला.

 Summer onion cost Rs | वणीत उन्हाळ कांद्याला १२ हजार रूपये भाव

वणीत उन्हाळ कांद्याला १२ हजार रूपये भाव

Next

वणी : येथील उपबाजार आवारात सोमवारी कांद्याला हंगातामील सर्वोच्च १२ हजार रूपये भाव मिळाला. कळवण येथील बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याला ११ हजार रूपये भाव मिळाला. कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त ११ हजार भाव मिळाला. सकाळ सत्रात ११८ ट्रॅक्टर, ११ पीकअप अशा १२९ वाहनांचा लिलाव करण्यात आला. लासलगांव बाजार समितीत उन्हाळ कांदा आवक घटली असून लाल कांदा ८१५२ रूपये भावाने विक्र ी करण्यात आला. राजस्थानमधील कांदा आवक कमी झाल्याने व अन्य राज्यात मागणीचा जोर वाढला आहे . त्यात उन्हाळा कांदा आवक कमी झाली आहे.त्याचा परिणाम मागणीचा पुरवाठा करण्याची जबाबदारी आता लाल कांद्यावर आली आहे. लासलगांव बाजार समितीत सोमवारी शुक्र वारच्या तुलनेत लाल कांदा भावात दोन हजार रूपयांची तेजी होत ८१५२ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. उन्हाळ कांदा आवक कमी झाली असुन केवळ तीन वाहनातील ३० क्विंटल कांदा आवक झाली तर १८५ वाहनातील १८५० क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल ८१५२ रूपये ७१०० व सरासरी भावाने झाला. मागील सप्ताहात लासलगांव बाजार समितीत शुक्र वारी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांदा ६५४१ तर लाल कांदा ६५२५ रूपये भावाने विक्र ी झाला. उन्हाळ कांदा आवक २५२ क्विंटल तर लाल कांदा आवक ३१५४ क्विंटल झाली. उन्हाळ कांदा भाव किमान २१०१ ते कमाल ६५४१ व सरासरी ४५०० रूपये तर लाल कांदा किमान २०२१ ते कमाल ६५२१ व सरासरी ५७०१ रूपये भावाने विक्र ी झाला.

Web Title:  Summer onion cost Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक