खामखेडा : ग्रामीण भागातील तापमानात गेल्या तीन-चार दिवसांपासून अचानक वाढ झाली असून, उष्णता वाढल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दरवर्षी मकरसंक्र ांतनंतर थंडी कमी होऊ लागते. चालूवर्षी परतीचा व बेमोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणात थंडी राहील, असा नागरिकांचा अंदाज होता. पावसाळा संपल्यानंतर त्या प्रमाणात थंडी नव्हती. परंतु डिसेंबर महिन्यात थोड्याफार प्रमाणात थंडीची चाहूल लागली. परंतु पाहिजे त्याप्रमाणात नव्हती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन प्रखर ऊन पडत असल्याने वातावरण उष्ण झाले आहे. या उष्ण वातावरणामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसून येत आहेत तर दुपारी प्रवास करणारे डोक्यावर टोपी किंवा उपरणे बांधून प्रवास करताना दिसून येत आहेत. या उष्ण वातावरणामुळे रस्त्याच्या कडेच्या रसवंती व थंड पेयाची दुकान थाटू लागली आहेत. या उन्हामुळे पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहे. शेतातील पिके दुपारच्या वेळेस कोमेजलेली दिसून येत आहेत.
खामखेडा परिसरात उन्हाळ्याची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 18:47 IST