सुखदेव बनकर यांची बदली उदय चौधरी नवीन सीईओ, आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा फटका?
By Admin | Updated: January 4, 2015 00:56 IST2015-01-04T00:55:41+5:302015-01-04T00:56:08+5:30
सुखदेव बनकर यांची बदली उदय चौधरी नवीन सीईओ, आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा फटका?

सुखदेव बनकर यांची बदली उदय चौधरी नवीन सीईओ, आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा फटका?
नाशिक : अवघ्या सव्वावर्षांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेला बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे उदय चौधरी यांची वर्णी लागली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुखदेव बनकर यांची आॅक्टोबर २०१३ रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार यांचाही अडीच वर्षांच्या कार्यकाळातच चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली होती. राज्यातील काही महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले असून, त्यात राज्यातील काही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौैधरी यांची बदली झाली आहे, तर सुखदेव बनकर यांना तूर्तास प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे कळते. सुखदेव बनकर यांनी यापूर्वी नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक म्हणूनही काम केले असून, नंतर त्यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुखदेव बनकर यांची बदली झाली होती. मात्र तेथूनही नाशिकला पुन्हा त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आॅक्टोबर २०१३ मध्ये बदली झाली. आता सव्वा वर्षाच्या कार्यकाळातच अचानक त्यांची बदली झाल्याने त्यांना आघाडी सरकारच्या कार्यकाळातील कामकाजाचा फटका बसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.