शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वाढदिवसाची पार्टी मागितली म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला.

नाशिक : वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे.पाथर्डी फाटा येथील अतुल बापूराव निकम (२४) व साक्षीदार गणेश सुधाकर क्षीरसागर (२०) शिवाजीनगरच्या भवर टॉवरसमोर उभे असताना तेथे संशयित आरोपी शिवाजीनगर येथील सौरभ अशोक यादव (२२) व सातपूरच्या अशोकनगर येथील शुभम अनिल कुमावत (२३) आले. यातील सौरभ यादवचा वाढदिवस असल्याने अतुल व गणेश यांनी सौरभकडे वाढदिवसाची पार्टी मागितली. त्याकारणाने राग येऊन संशयित आरोपीने शुभमची कुरापत काढून अतुल व गणेश यांना शिविगाळ केली. याचदरम्यान सौरभने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने अतुलच्या छातीवर डोक्यावर वार करून त्याला दुखापत केली, तर शुभम याने गणेश याला लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, तर याच प्रकरणत आरोपींनीही फिर्यादींवर उलट फिर्याद दाखल केली असून, वाढदिवसाची पार्टी मागणाऱ्या अतुल आणि गणेश यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी आपल्याला व साथीदाराला लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. पाळदे अधिक तपास करीत आहे.या प्रकरणी जिवे ठार मारण्याची धमकी व प्रयत्न तसेच शस्त्रबंधी आदेशाचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात सौरभ यादव व शुभम कुमावत यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी