साकोरा येथील शेतकऱ्यांची आत्महत्त्या
By Admin | Updated: August 14, 2016 01:48 IST2016-08-14T01:38:55+5:302016-08-14T01:48:32+5:30
साकोरा येथील शेतकऱ्यांची आत्महत्त्या

साकोरा येथील शेतकऱ्यांची आत्महत्त्या
नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील तरु ण शेतकरी दत्तू राघो बोरसे (४०) यानी विष प्राशन आत्महत्त्या केली़ सततची नापिकी व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून तणावाखाली वावरत असणारे दत्तू आज सकाळी त्यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल़े़ दत्तू यांनी विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज शव विच्छेदना वेळी व्यक्त करण्यात आला, असला तरी पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली
आहे़
चार एकर जमीन असलेल्या दत्तू बोरसे यांच्यावर सोसायटीचे
देखील काही प्रमाणात कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़
काल पासूनच नातेवाईक त्यांचा शोध घेत होते आज सकाळी मृतदेहचं मिळून आल्याने साकोरा गावात खळबळ उडाली आहे़ दत्तू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, देवदत्त सोनवणे, सतीश बोरसे व ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहीती दिली़
ग्रामीण रु ग्णालयात डॉक्टर रोहन बोरसे,डॉक्टर प्रशांत जुन्नरे यांनी शव विच्छेदन केले दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले (वार्ताहर)