येवला येथे मारहाण; दोघांविरोधात गुन्हे

By Admin | Updated: June 1, 2014 01:12 IST2014-05-31T00:14:44+5:302014-06-01T01:12:25+5:30

येवला : येवला शहर पोलिसांत परदेशी व जावळे यांनी परस्परविरोधात फिर्याद दिल्याने, दोघांविरोधात गुन्हे दाखल झालेअसून पोलीस तपास करीत आहेत.

Suicide in Yeola; Crime against both | येवला येथे मारहाण; दोघांविरोधात गुन्हे

येवला येथे मारहाण; दोघांविरोधात गुन्हे

येवला : येवला शहर पोलिसांत परदेशी व जावळे यांनी परस्परविरोधात फिर्याद दिल्याने, दोघांविरोधात गुन्हे दाखल झालेअसून पोलीस तपास करीत आहेत.
येवला नगरपरिषद आवारात स्वच्छता निरिक्षकांकडे या विभागात कर्तव्यावर कोणते कर्मचारी हजर आहेत या संबंधाने विचारणा करावयास गेल्यानंतर आपणास श्रावण जावळेसह इतर दहा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी ब्रम्हानंद परदेशी यांनी येवला शहर पोलिसात दाखल केली आहे.
पालिकेत स्वच्छता विभागात मुकादम असलेले श्रावण जावळे यांनी ब्रम्हानंद परदेशी यांचेविरोधात जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपअधीक्षक मनमाड या संबंधाने तपास करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Suicide in Yeola; Crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.