वडाळीभोई येथील विवाहितेची आत्महत्त्या
By Admin | Updated: November 18, 2015 23:05 IST2015-11-18T23:04:52+5:302015-11-18T23:05:42+5:30
दुर्दैवी : विष दिलेल्या बाळावर आडगाव येथे उपचार सुरू

वडाळीभोई येथील विवाहितेची आत्महत्त्या
वडाळीभोई : येथील सारिका अंकुश अहेर या २१ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली. तिने तिच्या पाच महिन्यांच्या बाळालाही विष दिले आहे.
दरम्यान, या पाच महिन्यांच्या मुलावर आडगाव येथील मेडिकल महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पती अंकुश अहेर व सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वडाळीभोई येथील लष्करी सेवेत दाखल असलेल्या अंकुश अहेर याचे दीड वर्षापूर्वी सारिका हिचेशी लग्न झाले. लग्नानंतर पाच तोळे सोने, ५० हजार रुपये माहेरून आणले नाही म्हणून सासरचे लोक तिला त्रास देत होते.
या जाचास कंटाळून तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची फिर्याद तिचे वडील रमेश भदाणे यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली आहे.
वडनेरभैरव पोलिसांनी पती अंकुश अहेर, सासरे भाऊसाहेब अहेर, नणंद आशा धनाईत, सोमनाथ शिंदे यांसह अजून चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला असून, पती, सासरा यांना अटक करण्यात आली आहे. वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)