अल्पवयीन मुलीसह दोघा तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 AM2021-05-09T04:16:11+5:302021-05-09T04:16:11+5:30

--- नाशिक : शहर व परिसरात विविध ठिकाणी एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीसह दोघा तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली ...

Suicide of two youths including a minor girl | अल्पवयीन मुलीसह दोघा तरुणांची आत्महत्या

अल्पवयीन मुलीसह दोघा तरुणांची आत्महत्या

Next

---

नाशिक : शहर व परिसरात विविध ठिकाणी एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीसह दोघा तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांनी गळफास घेत तर एकाने विषारी औषधाचे सेवन करत आपले जीवन संपविल्याचे समोर आले आहे.

पहिल्या घटनेत इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी शिवारात राहणाऱ्या आरती दुगालाल बींद (१६, रा. दामोदरनगर) हिने शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या स्वयंपाक खोलीतील छताच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब निदर्शनाला आल्यानंतर तिला मेडिकल कॉलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सीतागुंफ रोड परिसरात राहणाऱ्या उमेश काशिनाथ नाईक (३६, रा. निर्मल उपवन सोसायटी) याने शुक्रवारी दुपारी घराच्या छताच्या हुकला नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतला. या परकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तिसरी घटना नवीन नाशिकच्या डीजीपीनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. राजू कचरू वैरागड (३७, रा. मुरारीनगर, म डीजीपीनगर) असे आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे. त्याने शुक्रवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide of two youths including a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app