दोन महिलांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:10 IST2020-10-22T21:45:10+5:302020-10-23T00:10:58+5:30
पंचवटी : परिसरात राहणाऱ्या दोघा विवाहित महिलांनी काल बुधवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येची पहिली घटना त्रिकोणी बंगला पाठीमागे असलेल्या परिसरात तर दुसरी घटना हिरावाडीत घडली.

कालिकानगरला राहणाऱ्या अमृता योगेश खडसे (32) यांनी राहत्या घरात बेडरूम मध्ये स्लॅबच्या गजाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खडसे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. तर दुसऱ्या घटनेत प्रिया कुणाल गायकवाड (32) यांनी बेडरूममध्ये पंख्याला ओढणी लाऊन गळफास घेतला. या दोन्ही घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.