शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

By Admin | Updated: September 4, 2014 00:33 IST2014-09-04T00:15:41+5:302014-09-04T00:33:47+5:30

शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

Suicide with three children by farmer | शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

शेतकऱ्याने केली तीन मुलांसह आत्महत्त्या

 

दिंडोरी : पती-पत्नीच्या कौटुंबिक वादानंतर दोन मुली व मुलाला दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील एका शेतकऱ्याने मॅक्झिमो गाडीतून गणपती दाखवायला घेऊन जात गाडी पेठ रस्त्यालगतच्या रासेगाव शिवारातील एका खोल तलावात टाकत आत्महत्त्या केल्याचे उघड झाले असून, गाडीसह सर्व मृतांचे देह तलावाबाहेर काढण्यात आले आहेत.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी की, तालुक्यातील जांबुटके येथील दिनकर भगवंत अपसुंदे (४०) यांचे पत्नीसोबत नेहमीच कौटुंबिक वाद होत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. पत्नी अनिता ही दवाखान्यात गेली असताना दिनकर अपसुंदे याने मुलांना गणपती दाखवायला घेऊन जात असल्याचे सांगत मुलगा योगेश (१६), मुली वैशाली (१७), श्रद्धा ऊर्फ जिजा (७) यांच्यासह नवीन महिंद्रा मॅक्झिमो ही गाडी घेऊन नाशिकला गेले होते.
एक दिवस त्यांनी नाशिकला मुक्काम करत दुसऱ्या दिवशी मुलांना नवे कपडे घेत ते कपडे घालूनच मुलांसह जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, मंगळवारी (दि. २) दुपारी योगेश याचा मृतदेह नाशिक येथील पेठ रस्त्यानजीक रासेगाव शिवारातील एका तलावात आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात तलावात दिनकर यांचे पॅन कार्ड सापडल्याने इतर तिघेही तलावात असल्याचे संशयाने पोलिसांनी तत्काळ नाशिकला अग्निशमन दलाला पाचारण करत रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र काहीही आढळले नाही.


आज (बुधवारी) सकाळी तलावात मोठी मुलगी वैशाली हिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी पुन्हा अग्नीशमन दलाला तेथे पाचारण करत तपास कार्य सुरु केले. या पथकाने गळ टाकत शोध घेताच सुरवातीला दिनकर यांचा मृतदेह सापडला तर लहानगी श्रद्धा हिचाही मृतदेह शोध पथकाने शोधून काढला. मोठी क्रेन मागवत गाडीही बाहेर काढण्यात आली . दिंडोरी ग्रामीण रुण्णालयात शव विच्छेदन करण्यात येवून जांबूटके येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते पोलीस उपाधिक्षक संजय गुंजाळ यांनी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय शुक्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख, हवालदार बोरसे, मोगल आदि तपास करत आहे.
दरम्यान दिनकर अपसुंदे याच्या पहिल्या पत्नीने दहा वर्षापूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त असून अनिता हि त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी दिनकर वर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. पहिल्या पत्नीची योगेश व वैशाली हि मुले तर श्रद्धा हि दुसऱ्या पत्नीची मुलगी होती.
दिनकर ने जमिनीवर बँकेचे कर्ज घेतले होते, त्यावर त्याने जमीन विकत कर्जाची परतफेड करून दुधाचा व्यवसाय सुरु केला होता तर नव्यानेच मॅक्झीमो हि प्रवासी गाडी घेतलेली होती. त्याला दारूचे व्यसनही असल्याची चर्चा होती. त्यातूनच पती-पत्नीत वारंवार भांडण होत असल्याचे समजते.
दरम्यान आत्महत्येपूर्वी दिनकर याने सर्व मुलांना नवे कपडे घेत गाडीतून नासिक दाखवूून आणले नवीन कपडे घातलेले खुशीत असलेल्या मुलांना आज आपला मृत्यू येणार आहे. याची कल्पना मात्र दिनकर याने स्वत:सह मुलांनाही तलावात बुडवत आपली जीवनयात्रा संपवली.

Web Title: Suicide with three children by farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.