त्र्यंबकला युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:28 IST2019-03-14T18:26:59+5:302019-03-14T18:28:17+5:30
गंगाद्वार पहाडाच्या पायथा परिसरात राहणाऱ्या प्रसाद अशोक झोले (३१) याने गुरूवारी सकाळी परिसरातील आंब्याच्या झाडाला दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्र्यंबकला युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
त्र्यंबकेश्वर : येथील गंगाद्वार पहाडाच्या पायथा परिसरात राहणाऱ्या प्रसाद अशोक झोले (३१) याने गुरूवारी सकाळी परिसरातील आंब्याच्या झाडाला दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्र्यंबकेश्वर पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.यावेळी मृताच्या खिशात काहीही आढळून न आल्याने आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. प्रसादच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. यंबक पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. सहा.पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस नाईक मेघराज जाधव अधिक तपास करीत आहे.