तिडके कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:20 IST2017-09-01T17:20:44+5:302017-09-01T17:20:54+5:30

तिडके कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : तिडके कॉलनीतील ओयासिस सोसायटीत एका तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तेजस कैलास वाघचौरे (१४) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सरक ारवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सी.एस.निकम यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मयत तेजस वाघचौरेने गळफास घेतल्याचे लक्षात आले असत्या त्याला परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तेजसला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.