धोडंबेतील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या
By Admin | Updated: May 26, 2016 23:29 IST2016-05-26T23:22:05+5:302016-05-26T23:29:54+5:30
धोडंबेतील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या

धोडंबेतील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या
चांदवड/सोग्रस : चांदवड तालुक्यातील धोडंबे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
धोडंबे येथील शेतकरी लहानु भिका उशीर (५८) यांनी बुधवारी (दि. २५) रात्री प्रभाकर भायभंग यांच्या शेतातील सुबाभळीच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उशीर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वडाळीभोई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली
आहे. (वार्ताहर)