सातपूरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 19:35 IST2017-07-23T19:35:39+5:302017-07-23T19:35:39+5:30
रविवारीची घटना ; अकस्मात मृत्यूची नोंद

सातपूरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राहत्या घरात गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़ २३) सकाळच्या सुमारास घडली़ तुकाराम कांतिलाल आव्हाड (३७, रा़ श्रमिकनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ आव्हाड कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़