विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

By Admin | Updated: July 21, 2016 23:56 IST2016-07-21T23:49:18+5:302016-07-21T23:56:59+5:30

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

Suicide by taking a marriage plaintiff | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

पिंपळगाव बसवंत : येथे विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
येथील पाण्याच्या टाकीजवळील गोसावी वाडा या भागात राहणाऱ्या सौ. भाग्यश्री अमोल विदुर (२०) हिने बुधवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजता तिच्या फ्लॅटमध्ये छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या प्रकरणी भाग्यश्रीचे वडील मारुती तुकाराम पांचाळ (रा.आळंदी देवाची, पुणे) यांनी तक्र ार दिली आहे. भाग्यश्रीचे माहेर आळंदी असून, संशयित आरोपी तिचा पती अमोल लक्ष्मण विदूर हा दोन वर्षांपूर्वी आळंदी येथे मारुती पांचाळ यांच्या खोलीत भाड्याने राहत होता़ तो तिथे कंपनीत नोकरीला होता़ कोर्ट मॅरेज करून हे दोघे पिंपळगाव बसवंत येथे राहण्यासाठी आले व काही दिवसातच भाग्यश्री हिच्या वर चारित्र्याच्या संशयावरून अमोल तिला त्रास देऊ लागला होता़ या बाबतीत भाग्यश्री हिने आईवडील यांनाही माहिती दिली होती़ परंतु अतित्रास झाल्याने अखेर तिने आपली प्रेमाची जीवन यात्रा अखेर गळफास घेऊन संपविली़ या प्रकरणी पती अमोल लक्ष्मण विदुर, सासू मंगलबाई लक्ष्मण विदुर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांच्यासह हवालदार गिते, बैरागी आदि करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Suicide by taking a marriage plaintiff