सातपूरमधील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या
By Admin | Updated: April 3, 2017 22:40 IST2017-04-03T13:32:16+5:302017-04-03T22:40:59+5:30
सातपूरच्या कामगारनगरधील २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना

सातपूरमधील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या
नाशिक : सातपूरच्या कामगारनगरधील २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़२) सायंकाळच्या सुमारास घडली़ आरती गौरव सावकार (रा़बंगला नंबर १८, गुरुकुल हौसिंग सोसायटी, कामगारनगर, सातपूर) असे आत्महत्त्या केलेल्या महिलेचे नाव आहे़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरती सावकार यांनी राहत्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़