ंवसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: July 3, 2017 00:48 IST2017-07-03T00:48:23+5:302017-07-03T00:48:38+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील हॉस्टेलमधील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़

Suicide of a Student Hostel | ंवसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

ंवसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील एका शिक्षण संस्थेतील गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़२) दुपारच्या सुमारास घडली़ अपर्णा रमेश जाधव (१९, रा़ इंद्रायणी अपार्टमेंट, रामवाडी, डहाणू) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे़
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डहाणू येथील अपर्णा जाधव ही विद्यार्थिनी येथील एका संस्थेत शिक्षण घेत असून, तेथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती़ दुपारी दोन वाजेपूर्वी तिने हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़ सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicide of a Student Hostel