रिक्षाचालकाची सटाण्यात आत्महत्त्या
By Admin | Updated: July 31, 2016 01:22 IST2016-07-31T01:14:20+5:302016-07-31T01:22:19+5:30
डीवायएसपी ने मारहाण केल्याचा आरोप

रिक्षाचालकाची सटाण्यात आत्महत्त्या
सटाणा : शहरातील एका रिक्षा चालकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. मात्र डीवायएसपी यांनी मारहाण केल्याने चालकाने हे कृत्य केल्याचा आरोप करत मृताच्या कुटूंबियांनी रात्री उशिरापर्यंत डीवायएसपीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय सटाणा पोलीस ठाण्यातून मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला.
सुकड नाला येथील नाना सुरेश गरु ड (२७) हा त्याची रिक्षा (एम. एच. ४१- सी ६०७) प्रवाशांनी भरून ताहाराबादहून सटाण्याकडे येत होता. दरम्यान आव्हाटी फाट्याजवळ डीवायएसपी अशोक नखाते यांनी त्याची रिक्षा थांबवून त्याला बेदम मारहाण केल्याची रिक्षा चालकांमध्ये चर्चा आहे. त्यानंतर त्याच्यासह रिक्षा पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. काही वेळाने चालक नाना याला सोडून देत पोलिसांनी रिक्षा पोलीस ठाण्यात ठेवली. रिक्षाचालक नाना गरु ड यांने घरी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला मालेगाव येथे उपचारासाठी त्याला दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीय व रिक्षा चालकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह पोलीस ठाण्यात आणून तासभर ठिय्या दिला. कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह अंतिम संस्कारासाठी रवाना केला.