आत्महत्या प्रतिबंध जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:42 IST2017-09-11T00:42:11+5:302017-09-11T00:42:32+5:30
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

आत्महत्या प्रतिबंध जनजागृती रॅली
नाशिक : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल रॅलीदरम्यान ‘आत्महत्या समज-गैरसमज’ याबद्दलच्या माहिती पत्रक ांचे वाटप करीत जनजागृती करण्यात आली. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून आयोजित रॅली राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, नेहरू गार्डनमार्गे शालिमार येथील आयएमए सभागृह येथे संपन्न झाली. सायकियॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. बी.एस.व्ही. प्रसाद आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नाशिक, इंडियन सायकियॅट्रिक सोसायटी, आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यासह नाशिक रोटरी क्लब आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्यासह अनेक नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. उमेश नागपूरकर, डॉ. जयंत ढाके, डॉ. मानस सुळे, डॉ. मुक्तेश दौंड, डॉ. ज्योती उगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.