नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये (एमपीए) एका गरोदर महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.१८) उघडकीस आला. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारनंतर अकादमीमधील कर्मचारी पल्लवी प्रमोद गायकवाड (३० रा. एमपीए कर्मचारी वसाहत) यांनी राहत्या घरात छताला लावलेल्या पंख्याच्या सहाय्याने ओढणी बांधून त्याद्वारे गळफास घेत ल्याने ती मृत्युमुखी पडली. यावेळी घरात दुसरे कोणी नव्हते. याप्रकरणी जितेंद्र गोपीनाथ दिवे या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली असून यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ती पाच ते सहा महिन्यांची गरोदर होती. काही दिवसांपुर्वी एका युवकाने अकादमीमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
पोलीस अकादमीमध्ये गरोदर महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 19:35 IST
या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ती पाच ते सहा महिन्यांची गरोदर होती
पोलीस अकादमीमध्ये गरोदर महिलेची आत्महत्या
ठळक मुद्दे पंख्याच्या सहाय्याने ओढणी बांधून त्याद्वारे गळफास घेत ल्याने ती मृत्युमुखी ती पाच ते सहा महिन्यांची गरोदर होती.