नाशकात सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
By Admin | Updated: March 8, 2017 22:00 IST2017-03-08T21:58:09+5:302017-03-08T22:00:38+5:30
आडगाव पोलीस ठाण्यातील;मंगळवारी रात्रीची घटना

नाशकात सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
नाशिक : गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित जितेंद्र निंबा माळी (२९, रा़ सत्यम रो हाउस, श्रीरामनगर, आडगाव) विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जितेंद्र माळी हा रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात आला़ यावेळी काम करीत असलेले सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांना आमच्या घरी का आला असे म्हणून अरेरावी व शिवीगाळ सुरू केली़ तसेच कुठे आहे सानप, काय करायचे असेल ते करून घ्या अशी दमदाटी करून पाटील यांना बोलावून मारहाण केली़ तर पाटील यांच्यासमवेत असलेल्या पोलिसांनी माळी यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली़
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी संशयित माळी विरोधात फिर्याद दिली आहे़(प्रतिनिधी)